जळगाव, प्रतिनिधी । पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (हवामानावर आधारीत)सन २०२०-२१ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई फक्त १३५०० रुपये देण्यात आली असून उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी होती. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने निकषानुसार भरपाई द्यावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषी आयुक्त यांचेकडे केली होती.
खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी पत्र क्र.36734 दि.9 नोव्हेंबर 2021 च्या पत्रान्वये विभागीय व्यवस्थापक बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांना रु.22500/- प्रति हे. या प्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करण्याचे आदेश दिले असून रु. 13500/- प्रति हे. ची नुकसान भरपाई चुकीची असून रु.9000/- प्रति हे. चा फरक तात्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून वाढीव नुकसान भरपाई मिळणार आहे.
अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे तीन कोटींची नुकसान भरपाई मिळाली वाढवून
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सातत्याने केळी पीक विमाधारक शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी प्रसंगी आवाज उठवला आहे. आपल्या अभ्यासपूर्ण पाठपुरावा आणि पत्रव्यवहारातून खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सात्यत्याने केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज देखील 3091 शेतकऱ्यांना सुमारे 3.00 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाढवून मिळाली आहे. यामुळे केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आभार मानले आहेत.