Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोरा येथे ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

by Divya Jalgaon Team
November 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथीलसुखदेव हिलाल पाटील (वय ४८) या शेतकऱ्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुखदेव पाटील हे सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. दुपारी ते पाणी घ्यायला जवळच्या  शेतातील विहिर असलेल्या ठिकाणी गेले. मात्र विहीरीतून पाणी काढत असतांना त्यांचा तोल जावुन ते विहीरीत पडले. त्यातच पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान ते पाणी घेऊन परतले नसल्याने घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेत असतांनाच धना अहिरे यांच्या शेतातील विहीरी जवळ सुखदेव पाटील यांचे बुट दिसून आले. त्यावर विहीरीत शोध घेण्यात आले असता सुखदेव पाटील यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेमुळे  परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुखदेव पाटील यांचा मृतदेह ग्रामीण महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुर्यकांत नाईक हे करीत असून मयताच्या पाश्चात्य पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Share post
Previous Post

चार ते पाच जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मृत्यू

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ९ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ९ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group