जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडून मागविली ५ वर्षांची माहिती. अवैध गौण खनिज प्रकरणात बोगस पावत्यांसाठी राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला असल्याने संबंधीत दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली आहे. या प्रकरणी मंगळवारी ३ रोजी जिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे सुनावणी झाली. यात जिल्हा परिषदकडून २०१५ पासूनची माहिती मागविण्यात आली आहे.
जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे असलेल्या बनावट वाळूच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुर्हा-वराडसीम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली.जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडून मागविली ५ वर्षांची माहिती.
या प्रकरणात माहिती अधिकारात माहिती मागवूनही संबधित विभागाने माहिती दिली नाही. लघुसिंचन, जलसंधारण, बांधकाम या विभागातील कामे ही बोगस पावत्याप्रकरणी संशयाच्या भोवर्यात आहेत. ठेकेदार, शाखा अभियंत्यापासून संबधित विभागाचे प्रमुख, लेखा परीक्षक यांच्यापर्यंत यंत्रणेतील अनेकांचा यात सहभाग आहे. संगनमताने हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करण्यात आलेला आहे. प्रकरणी यंत्रणेकडून आतापर्यंतच संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज होती. परंतु, सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.
पल्लवी सावकारे यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सुनावणी झाली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या सिंचन अधिकारी यांच्या नावे नोटीस काढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी पावत्या खोट्या असल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या तक्रारदार सावकारे यांनाही उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच २०१५ पासूनची जिल्हा परिषदेकडून
मागवली आहे. त्याची माहिती आली कि पुढील निकाल लागेल. याबाबत पल्लवी सावकारे यांनी माहिती दिली कि, या प्रकरणात सिंचन अधिकारी, ठेकेदार, ऑडिट करणारे यांच्यासह मोठी साखळी असून त्यांनी मोठा गैरव्यवहार केलेला दिसून येत आहे. जिल्हाधिकारी यांनी आणखी कोणत्या तालुक्यात अशी रॉयल्टी बुडवून गैरव्यवहार झाला आहे त्याची देखील माहिती घेण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे त्या म्हणाल्या. घोटाळ्यातील दोषी साखळीवर राजद्रोहासह इतर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.
अजून वाचा
संबंधीत दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – सावकारे