Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मार्क झुकरबर्गने केली नव्या नावाची घोषणा; ‘फेसबुक’च्या लोगोतही बदल

by Divya Jalgaon Team
October 29, 2021
in राष्ट्रीय
0
मार्क झुकरबर्गने केली नव्या नावाची घोषणा; ‘फेसबुक’च्या लोगोतही बदल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जगात एक नंबरवर असणारी सोशल नेटवर्किंग कंपनी म्हणजेच फेसबुकचे नव्याने बारसे झाले आहे. फेसबुकचा संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने याविषयी माहिती दिली. कंपनीच्या वार्षिक सभेत याविषयीची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात बोलत असताना, झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितले आहे. फेसबुकचे नवे नाव ‘मेटा’ असे असेल अशी माहिती दिली.

मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे केलेले आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असे म्हटले जाते. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही ‘मेटा’ या नावाने ओळखले जाणार आहोत, असे मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.

सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उप कंपन्या आहेत. यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि अ‍ॅपची नावं बदलली जाणार नाहीत असे मार्क झुकरबर्गने स्पष्ट केले आहे. म्हणजेच अगदी साध्या शब्दात सांगायचे झाल्यास फेसबुकने केलेला बदल हा पूर्णपणे व्यवसायिक असून वापरकर्त्यांवर म्हणजेच त्यांची सेवा वापरणाऱ्यांवर सध्या तरी काही मोठा परिणाम होणार नाही. या पुढे आम्ही सर्व कारभार हा फेसबुक फर्स्ट धोरणाऐवजी मेटाव्हर्स फर्स्ट या भूमिकेमधून करणार आहोत. यासंदर्भात मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

केवळ नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचं चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे. या चिन्हामधून आणि नवामधून फेसबुकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन आता याच ब्रॅण्डनेमखाली केलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मेटा या ब्रॅण्डनेमअंतर्गत प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये काम केलं जाईल. पहिलं म्हणजे सध्या ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांचे आणि दुसरं भविष्यातील तंत्रज्ञान आणि संशोधनासंदर्भातील असणार असे झुकरबर्गने म्हटले आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २९ ऑक्टोबर २०२१

Next Post

सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त, तीन जण ताब्यात

Next Post
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त, तीन जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group