जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक 27 बुधवार रोजी ११ वाजता इकरा यूनानी मेडिकल कॉलेज येथे नवीन कोविड लसीकरण सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद निकुंभ, सोसायटीचे सचिव एजाज मलिक, गुलाम नबी बागबान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस, उपप्राचार्य डॉ. शोएब शेख व डॉ. हारून बशीर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अब्दुल करीम सालार यांनी कोरोना लसीकरणाचे पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर करीम सालार यांनी सांगितले की, आम्ही कोरोना काळापासून कोरोनाशी लढा देत आहोत. मी पूर्वी लस घेतलेली नाही परंतु समाजातील विशेषता महाविद्यालयातील आमचे विद्यार्थी व विद्यार्थिनी कर्मचारी व पालक वर्गांनी सुद्धा लस घेण्यास घाबरू नये, या उद्देशासाठी मी लस घेतलेली आहे. म्हणून आपण न घाबरता लस घेऊन विविध प्रकारे रोगाविरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढवावी व या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत सामील व्हावे. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, इकरा यूनानी मेडिकल कॉलेजचे कोरोना काळात असलेले योगदान हे फार मोठे आहे त्यांनी सुरुवातीपासून या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत प्रशासनाला मदत करत आहे व आज कोरोना लसीकरण सेंटरच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे मानस केले आहेत. या कार्यक्रमात आलेले सर्व मान्यवरांचे कॉलेजचे उप प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी आभार मानले.