जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लिमिटेड उर्फ सोसायटी जळगाव चे होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूक 2021 बाबत लोकमान्य प्रगती गटाची मनोमिलन सहविचार सभा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटना कार्यालय जळगाव येथे लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर शिवराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
वेध प्रगती गटाचे अध्यक्ष रवींद्र साळुंखे, प्रभाकर सोनवणे, अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकमान्य गटाच्या नेतेपदी तत्कालीन गस सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. येत्या काळात होऊ घातलेल्या तसं सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत सभासदांना समोर संस्थेच्या सभासद हितासाठी ध्येय धोरणे आखण्यात आली. कमी व्याजदरात कर्ज , मयत सभासद स शंभर टक्के कर्जमाफी , कर्ज मर्यादा वाढ दिव्यांगांना विशेष कर्ज ठेवींवर विशेष योजना इत्यादी विविध देण्यात येतील. सभासद यांना गटाच्या अध्यक्ष गंजीधर पाटील, गटनेते मगन नाना पाटील, तुकाराम बोरोले, गटाचे नेते विलास नेरकर, मुख्याधिकारी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर सोनवणे, बी टी बाविस्कर, अनिल तळेले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे समन्वयक सर्जेराव बेडिस्कर, जळगाव मनपा संघटनेचे अ वा जाधव, सुभाष मराठे, जिल्हा परिषद लेखा संघटना याचे सलीम तडवी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघटनेचे गाजरे आदींनी संबोधन केले. सभेत संभाव्य प्रमुख उमेदवार यांचा परिचय देण्यात आला
स्थानिक मतदार संघ –
डॉ. रवींद्र साळुंखे, राजेश पवार, अमित पाटील, प्रा. आर. एस. पाटील, योगेश नन्नवरे (महसूल), बाहेरील मतदारसंघ अजित पाटील चाळीसगाव, विश्वास सूर्यवंशी चाळीसगाव, विलास नेरकर (इमाव), डी एन पाटील भडगाव, सुनील पाटील पाचोरा, संजय पाटील जामनेर, मुकेश तुकाराम बोरोले रावेर, योगेश इंगळे (यावल/भुसावळ), ज्ञानेश्वर पाटील (मुक्ताईनगर /बोदवड), व. ना पाटील एरंडोल धरणगाव, विलास पाटील पारोळा, मगन बाविस्कर चोपडा, सुनील पाटील पारोळा.
महिला राखीव
जागृती पाटील-पवार पारोळा.
वि. जा./भ. ज
कोमल जाधव.
तसेच शिक्षक भारती संघटनेचे सोमनाथ पाटील, अजयकुमार पाटील, नारायण वाघ, आर के पाटील, सुधाकर सूर्यवंशी, प्रदीप सोनवणे, राजेंद्र ठाकरे, आरसिंग राजपूत, पंजाबराव देशमुख संघटना, कैलास सोनवणे, आर के माळी, दीपक सूर्यवंशी, किशोर पाटील जामनेर, किशोर भाऊलाल पाटील जळगाव ग्रामीण आदिवासी विकास पतसंस्थेचे संचालक तसेच अध्यक्ष दिव्यांग कर्मचारी संघटना जळगाव जिल्हा सभेचे प्रास्ताविक संजय भानुदास पाटील त्यांनी केले तब्येत सभेचे श्रेष्ठी गं साहेबराव पाटील सा दे महाजन सुरेश पाटील, वाय एम पाटील, डी ए पाटील, महसूल संघटनेचे योगेश नन्नवरे, नूतन मराठा उपाध्यक्ष प्रवीण जाधव, किरण तळेले, शिवाजी पाटील, शांताराम पाटील, पी डी पाटील, राजेंद्र सिंग पाटील, अनिल झोपे, प्राध्यापक डी पी पवार, गिरीश वाणी आदी बहुसंख्य सभासद वर्ग उपस्थित होता.
प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक संघटना ,राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच म.ना पा संघटना न.पा संघटना सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचारी संघटना आदिवासी विकास संघटना, कास्ट्राईब संघटना तसेच जिल्हा आरोग्य व हिवताप कर्मचारी संघटना जिल्हा न्यायालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना ,अभियांत्रिकी कॉलेज व ITI संघटना, विद्यापीठ संघटना, चतुर्थ श्रेणी संघटना , वाहन चालक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे इत्यादींनी पाठिंबा दिला आहे.