जळगाव, प्रतिनिधी । आज दि. २१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नियुक्ती पत्र देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.