Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपला धक्का : शिवसेनेचे २ तर राष्ट्रवादीचे १ उमेदवारांची बिनविरोध निवड

by Divya Jalgaon Team
October 21, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर न जाता वेळेतच होणार

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झालं असून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. यापूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे २ तर राष्ट्रवादीचे १ असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

दरम्यान काल बुधवार रोजी छाननीत विरोधकांचे अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. छाननी दरम्यान अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले असून यात अमळनेर मधून भाजपच्या माजी आ. स्मिता वाघ यांचा अर्ज बाद करण्यात आला तसेच मुक्ताईनगर आणि बोदवड येथील उमेदवारांचे अर्ज देखील बाद झाले. खा. रक्षा खडसे, स्मिता वाघ, संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

यामुळे सोसायटी मतदारसंघातून अमळनेर येथून राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील तर बोदवड मधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. मुक्ताईनगर मधून फक्त माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज आहेत. यात रोहिणी खडसे अर्ज मागे घेऊन त्या महिला वर्गवारीतून निवडणूक लढविणार असल्याचं समजतं यामुळे एकनाथ खडसेंचा विजय निश्‍चीत मानला जात आहे.

Share post
Previous Post

सोन्याच्या दरात घसरण सुरूच, तर चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या दर

Next Post

नारीशक्ती गृपच्या मनिषा पाटील यांना राज्यस्तरीय नारीदीप पुरस्कार जाहीर

Next Post
नारीशक्ती गृपच्या मनिषा पाटील यांना राज्यस्तरीय नारीदीप पुरस्कार जाहीर

नारीशक्ती गृपच्या मनिषा पाटील यांना राज्यस्तरीय नारीदीप पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group