जळगाव: सामान्य जीवनावर कोविडचा झालेला परिणाम या विषयावर जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे शालेय व महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील ई-पोस्टर सादरीकरण खुल्या स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
रायसोनी महाविद्यालयातर्फे नेहमीच वेगवेगळ्या कौशल्य विकास व उद्योजकता दृष्टीकोन वाढविण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर राष्ट्रीय स्पर्धेत संपूर्ण भारतातून शालेय व प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष शाखेतील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला. विध्यार्थ्यानी जनसामन्यावर कोविडचा झालेल्या परिणामाचे सृजनशीलतेने व अभ्यासपूर्ण सादरीकरणे केली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. हरीश भंगाळे , प्रा. प्रिया टेकवानी, प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. प्रशांत देशमुख यांनी काम पाहिले.
ई-पोस्टर सादरीकरण स्पर्धेत शालेय गटातील प्रथम क्रमांक – तोशल पाटील, द्वितीय क्रमांक – आनंदी याद्निक, तृतीय क्रमांक – ऋषिकेश याद्निक तसेच महाविद्यालयीन गटातील प्रथम क्रमांक – नितीन पाटील, द्वितीय क्रमांक – प्रशांत पंडित, तृतीय क्रमांक – रोहिणी तायडे या क्रमवारीने विध्यार्थ्यानी पारितोषिके पटकावली.
विजेत्या स्पर्धकांचे रायसोनी इंस्टिट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. मोनाली शर्मा , प्रा. योगिता पाटील व प्रा. डॉ. मकरंद वाठ यांनी सहकार्य केले.