जळगाव प्रतिनिधी l जवळपास 40 वर्ष ज्या विचारांसाठी लढा दिला त्यां विचारांच्या विरोधी लोकांसोबत नाथाभाऊंचे जमेल काय ? असा सवाल आज खासदार उन्मेष दादा पाटील यांनी विचारला ते जिल्हा परिषदेतील भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
खासदार उमेश पाटील यांनी काल महापालिकेत बैठक घेतल्यानंतर आज त्यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन तेथे बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सद्यस्थितीतील राजकारणावर भाष्य केले. एकनाथराव खडसे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते जात असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की अद्याप कोणालाही जबाबदार लोकप्रतिनिधीने राजीनामा दिलेला नाही किंवा पक्षाचा त्याग केलेला नाही.
आम्ही खडसे यांना आधीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण आजवर जवळपास सुमारे चाळीस वर्षे ज्या विचारांशी त्यांनी संघर्ष केला त्यांच्यासोबत नाथाभाऊंचे जमेल काय ? असा खडा सवाल उमेश पाटील यांनी याप्रसंगी केला. तर जळगाव शहरात विकासकामे सुरू होणार असून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची ग्वाही देखील खासदार उमेश पाटील यांनी याप्रसंगी दिली