Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जागतिक मानसिक स्वास्थ् दिनी मोबाईल व्यसन मुक्ती मदत क्रमांकचा लोकार्पण सोहळा

by Divya Jalgaon Team
October 11, 2021
in जळगाव
0
जागतिक मानसिक स्वास्थ् दिनी मोबाईल व्यसन मुक्ती मदत क्रमांकचा लोकार्पण सोहळा

जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक स्वास्थ् दिनाचा मुहूर्त साधून कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जलगाव मीडटाऊन यांनी संयुक्तपणे मोबाईल व्यसन मुक्ती हेल्पलाईन क्रमांक लॉन्च केलं.

10 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक मानसिक स्वास्थ् दिन म्हणून साजरा केला जातो आणि आणि सध्याच्या काळात किंवा कोवेड नंतरच्या काळात लोकांचे मानसिकता वर खूप वाईट परिणाम झाला आहे. आपण आपले शारीरिक स्वास्थ्य कडे लक्ष देतो पण मानसिक आरोग्यअची जास्त काळजी करत नाही किंवा त्याच्या सोबत जुळलेल्या prejudice मुळे आपण ते लोकां सोबत शेअर करत नाही. सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेक मुळे आपल्या रोजचे दैनंदिनी दिनचर्या किंवा आपल्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरी पारिवारिक वातावरणत खूप कमतरता निर्माण झाली आहे. त्याचे मुळे सामाजिक व पारिवारिक बांधिलकी, एकामेकांशी समोर समोर बोलण्याचे अभाव मुळे आपसातला संपर्क कमी होत चालला आहे आणि मोबाईल हे मानसिक आजाराचा स्रोत ठरत आहे. ह्या गोष्टीचा आढावा घेतला इंडिया इन टॉलरन्स या पुस्तकाचे लेखक तारिक शेख यांनी आणि या संकल्पनेतून लॉन्च केला मोबाईल व्यसनमुक्ती दूरध्वनी क्रमांक आणि त्यांना प्रोत्साहन दिला कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव मिड टाऊन ह्यांनी.

10 ऑक्‍टोबरला एका ऑनलाईन कार्यक्रमात संध्याकाळी साडेसात वाजता गुगल मिटच्य माध्यमातून ” मोबाईल व्यसनमुक्ती मदत क्रमांक” चा लॉन्चिंग अँग्लो उर्दू जुनियर कॉलेजची माजी शिक्षिका अमिना अब्दुल रौफ शेख यांच्या हस्ते पहिला कॉल करून, लोकार्पण करण्यात आला.

सदरचे कार्यक्रमात रोटरी क्लब जळगाव मीड टाऊन चे अध्यक्ष डॉक्टर विवेक वडजीकर, राष्ट्रीय मोटीवेशनल ट्रेनर प्रोफेसर सैयद अल्ताफ अली, महानगरपालिका स्वास्थ अधिकारी डॉक्टर विकास पाटील आणि जळगाव सायकॉलॉजिकल कौन्सिलर असोसिएशन चे संस्थापक सदस्य डॉक्टर अपर्णा मकासरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

सर्वप्रथम अमिना शेख मॅडम यांनी मोबाईल चे अतिवापरामुळे परिवारात एकमेकांसाठी वेळेचा अभाव व त्यामुळे निर्माण होणारी उणीव भरण्यात ह्या मोबाईल व्यसन मुक्ती मदत क्रमांक च्या सहकार्य होईल असं मत मांडले व कॅटलिस्ट फाउंडेशन आणि रोटरी क्लब जळगाव मीड टाऊनयांना शुभेच्छा दिले.

डॉक्टर विवेक वडजिकर यांनी मोबाईल आणि त्याचे जास्त वापरामुळे परिवारत कलह निर्माण होऊन त्याचे मुळे होणारे वाईट परिणाम ह्याचा आढावा घेतला त्यानंतर प्रोफेसर सय्यद अल्ताफ अली यांनी मोबाईल व त्याच्या लहान बाळाचे जीवनावर परिणाम व दुष्परिणाम यावर व्यवस्थित मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला डॉक्टर अपर्णा मकासरे यांन मोबाईल चा जास्त वापर व त्याच्या मुळे शरीरात हॉर्मोन्स मध्ये होणारा बदल आणि त्यामुळे आपले मानसिक स्थितीवर होणारा परिणाम यांच्यावर सविस्तर चर्चा केली. आपण मोबाईलचा किंवा त्याचे जास्त वापराच्या व्यसनाचे बळी पडण्या पेक्षा मोबाईलच्या स्मार्ट वापर करण्यावर जास्त भर दिला पाहिजे.

शेवटी महानगरपालिका स्वास्थ अधिकारी डॉक्टर विकास पाटील यांनी सध्याचे Covid काळात मोबाईलचे अतिवापरामुळे बालकांमध्ये खुले वातावरणात खेळण्याच्या सवय ला खुप कमतरता आली आहे व त्याच्या मुख्य कारण माता-पिता यांचा मोबाईल च्या जास्त वापर आहे व मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वात अगोदर माता-पिता यांना आपल्या मोबाइल वापरायचा वेळ सीमित करावा लागेल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे शेवटी या ” मोबाईल डी एडिक्शन हेल्पलाइन” ह्या संकल्पनेचे शिल्पकार तारीक शेख यांनी आपण मोबाईलचा वापर केला पाहिजे नाके मोबाईल ने आपला वापर केला पाहिजे असं सांगून , मान्यवरांचे व सगळे उपस्थित नागरिकांचे आभार मानले व या सुविधा चे जास्त जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
हे नाविन्यपूर्ण प्रकल्प जळगाव नव्हे तर खानदेशातला पहिला प्रकल्प आहे व निशुल्क आहे. सदरहू कार्यक्रमाला 50 पेक्षा जास्त नागरिक गुगल मीटचे माध्यमातून हजर होते.

दूरध्वनी क्रमांक :७५०७६४९४८१ ई-मेल आयडी : [email protected]

ही सुविधा मोबाईल वर आहे व ह्या मोबाईल नंबर केव्हा ईमेलवर संपर्क करणारे व्यक्तींची माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल अशा आश्वासन रोटरी क्लब ऑफ जळगाव मीड टाऊन चे मानद सचिव तारिक शेख यांनी दिला आहे.

Share post
Previous Post

नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शिलाई मशीन वाटप

Next Post

भाजपा जिल्हा महानगरातर्फे पर्यावरण पंधरवडानिमित्त आपट्याचे झाडाचे वृक्षारोपण

Next Post
भाजपा जिल्हा महानगरातर्फे पर्यावरण पंधरवडानिमित्त आपट्याचे झाडाचे वृक्षारोपण

भाजपा जिल्हा महानगरातर्फे पर्यावरण पंधरवडानिमित्त आपट्याचे झाडाचे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group