चोपडा, प्रतिनिधी । खगोल विज्ञानी डॉ. मेघनाथ साहा यांची सहा ऑक्टोबर जयंती,त्या निमित्ताने त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे पार पडला.
तेली समाजात जन्माला आलेले खगोल विज्ञानी यांनी संपूर्ण भारताला राष्ट्रीय शक पंचांगची महत्त्वपूर्ण देणगी दिली. देशात वैज्ञानिकांना संशोधनासाठी साहा नाभिकीय भौतिक संस्थान व इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स अशा दोन संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून पुढे अनेक नवनवीन शोध लागले. त्यामुळे त्यांचे कार्य देश विसरू शकत नाही. ते थोर स्वातंत्र्यसेनानी होते. तेली समाजाला त्यांचा फार मोठा अभिमान आहे .जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा, श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. श्री नारायण पंडित चौधरी, ह-भ-प गोपीचंद महाराज ,महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष देवकांत के. चौधरी, प्रकाश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, जगदीश मिस्तरी या मान्यवरांची उपस्थिती होती. के. डी. चौधरी यांनी यावेळी डॉक्टर मेघनाथ साहा यांच्या जीवन परिचय करून दिला. गोपीचंद चौधरी यांनी आभार मानले.