Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वरणगाव शहरातील बंद रेशन कार्ड धारक व अपंग बांधवांना धान्य सुरू करा

जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी

by Divya Jalgaon Team
October 5, 2021
in जळगाव
0
वरणगाव शहरातील बंद रेशन कार्ड धारक व अपंग बांधवांना धान्य सुरू करा

वरणगाव, प्रतिनिधी । पन्नास हजार लोकसंख्येचे शहर आहे शहरांमध्ये सिद्धेश्वर नगर, आकासा नगर, रामपेठ, जुने गाव यासह संपूर्ण शहरात शेतमजूर शेतकरी मजूर बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र पुरवठा विभाग या नागरिकांना त्यांच्या रेशन कार्ड वर धान्य देत नसल्याची तक्रार आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे कायद्या आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. ए जी जंजाळे, भाजपाचे कमलाकर मराठे, हितेश चौधरी, किरण धुंदे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले.

निवेदनात असे म्हटले आहे की, वरणगाव शहरात अपंग बांधवांची सध्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना सुद्धा धान्य धान्याचा लाभ मिळत नाही. तसेच नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी वरणगाव शहरात शिबिर घेण्यात यावे, अशा प्रकारची मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते. चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बंद रेशन कार्डधारकांना रेशन चालू करण्यासंबंधी तात्काळ कार्यवाही करतो, अशा प्रकारचे आश्वासन यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळास दिले व जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी तात्काळ भुसावळचे तहसीलदार धिवरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व वरणगाव शहरात जनतेच्या सुविधेसाठी एक शिबिर घेऊन बंद रेशनकार्डधारकांना तसेच अपंग बांधवांना शासनाच्या रेशन धान्याचा लाभ मिळाला पाहिजे, यासंबंधी तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना भ्रमणध्वनीवरून तहसीलदार धिवरे साहेब यांना देण्यात आले.

Share post
Previous Post

शिंदाड येथे आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने एक हजार लस उपलब्ध

Next Post

सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group