मुंबई, वृत्तसंस्था । एसटी महामंडळ जुन्या एक हजार गाड्यांचे रूपांतर सीएनजी गाड्यांमध्ये करणार आहे. या गाड्या लांब पल्ल्यासाठी धावणार आहेत. डिझेलसाठीही पैसे नसल्याने राज्यभरात सुमारे ११०० बसेसच्या फेऱ्या रद्द करून बसेस उभ्या ठेवण्याची वेळ महामंडळावर आली होती.
एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एसटीचे कोरोनापूर्वी रोज २१ कोटींचे उत्पन्न होते. आता ते १२ कोटींवर आले आहे. साधरणपणे ९ कोटींचा डिझेलचा खर्च आहे. डिझेलमुळे खर्च वाढतो आणि प्रदूषणात वाढ होते. त्याऐवजी सीएनजीचा वापर झाला तर महामंडळाची मोठी बचत होणार आहे.
सध्या शहरात चालणाऱ्या सिटी बस या सीएनजीवर चालवल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी चालविण्यात येणाऱ्या सीएनजी बस वापरात येत नव्हत्या. प्रथमच या गाड्या वापरणार आहेत. अर्थसंकल्पात १४० कोटींची तरतूद केली आहे.