Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रेतमाफियांची मुजोरी तलाठ्यास लाकडी दांडक्याने मारहाण

by Divya Jalgaon Team
September 28, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
रेतमाफियांची मुजोरी तलाठ्यास लाकडी दांडक्याने मारहाण

चोपडा – अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार अनिल गावीत यांच्या आदेशाने शहर तलाठी ए.बी. सोनवणे, देवगाव तलाठी भूषण विलास पाटील, वडगाव बुद्रूकचे तलाठी आशिष कडूबा काकडे व निमगव्हाणचे तलाठी कल्पेश वकील कुंवर हे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील पंकज नगरमध्ये गस्त घालत होते. त्याचवेळी बोरोले नगर-२ मध्ये रिषीका अपार्टमेंट समोरून एक ट्रॅक्टर (क्र.-एम एच १९ सी झेड ०५४३) वाळू घेऊन जात होते.

तलाठी सोनवणे यांनी ट्रॅक्टर अडविले आणि चालक व सोबत बसलेल्या व्यक्तीची विचारपूस केली. त्यावेळी या दोघांनी पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यावेळी सोनवणे यांनी चालकाला ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे नेण्यास सांगितले. त्यावर आपण ट्रॅक्टर येणार नाही, असे सांगून दोघांनी तलाठी सोनवणे व पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. यावेळी ट्रॅक्टर पळवून नेण्यास सुरुवात केली.

यावेळी सोनवणे व कर्मचारी ट्रॅक्टरला आडवे झाले असता चालकाने कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला तर चालकाच्या सोबत असलेल्या इसमाने लाकडी दंडुका काढून तलाठी सोनवणे यांच्या डोक्यावर टाकला व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाल्याने ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीतील वाळू रस्त्यावर उपसली यावेळी पोलीस व्हॅन दाखल झाल्याने ट्रॅक्टर सोडून दोघे जण पळून गेले.त्यानंतर तलाठी आशिष काकडे यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालयावर आणले.

तलाठी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला ट्रॅक्टरचालक व सोबत असलेल्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: #anil gawit#awaidh walu wahtuk#Ret mafiya#talathi Ab sonwane#talathi bhusan patil
Previous Post

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाचोरा शहर बंद यशस्वी

Next Post

जळगावातील सम्राट कॉलनीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाची आत्महत्या

जळगावातील सम्राट कॉलनीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group