जळगाव – ए आई एम आई एम उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांनी नुकत्याच झालेल्या बोदवड घटनेच्या संदर्भात (मुजफ्फर असगर अली घटना) मजलिस पदाधिकाऱ्यांसह जळगावला भेट दिली.
शिष्टमंडळाने प्रथम पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि मजलिसच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आणि कुटुंबाला सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले व जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीडितेची भेट घेतली असून त्याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांची भेट घेतली व त्यांनी याबाबत आश्वासने दिली. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष अहमद शेख ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व विदर्भ प्रभारी विद्यार्थि अघाड़ी सनीर सय्यद , नंदुरबार जिल्हाध्यक्ष हाजी जीशान पठाण, जळगाव लोकसभा अध्यक्ष एड. इम्रान साहिल आणि महानगर अध्यक्ष सय्यद दानिश, उत्तर महाराष्ट्र सहसचिव फिरोज शेख , , जळगाव जिल्हा महासचिव ईम्रान खान आणि इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.