जळगाव प्रतिनिधी – शहरातील स्वातंत्र्य चाैकाजवळ बुधवारी डेरेदार गुलमाेहाेराचे झाड रस्त्यावर काेसळले. त्यासाेबतच विजेचा पाेल व वसतिगृहाची भिंतही काेसळली आहे. झाडाखाली दाेन कार दाबल्या गेल्याने नुकसान झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर येस बँकेजवळ एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे.
या वसतिगृहाच्या आवारातील गुलमाेहाेराचे झाड अचानक काेसळले. तेथील विद्युत वाहिनी व पाेल त्यात अडकल्याने ते काेसळले. वसतिगृहाची भिंतही काेसळली. स्वातंत्र्य चाैकात सिग्नल सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याच्या मार्गावर रेड सिग्नल असल्याने रस्त्यावरून काेणीही जात नव्हते.
त्यामुळे माेठी जीवितहानी टळली; परंतु झाड मुळासकट रस्त्यावर काेसळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक खाेळंबली हाेती. तातडीने महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत बारी, सुनील मोरे, अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, हिरामण बाविस्कर, तेजस जोशी व संतोष तायडे या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.