मेष:-
काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा.
वृषभ:-
बोलण्यातील कटुता टाळा. जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.
मिथुन:-
बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडाल. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळाव्यात. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
कर्क:-
उत्तम वाहन सौख्य लाभेल. शांत विचाराने कामे पूर्ण करा. मुलां प्रतीच्या जबाबदार्या पार पाडाल. कामा निमित्त छोटे प्रवास घडतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.
सिंह:-
आपल्या निर्णयावर ठाम राहाल. नम्रपणे बोलून आपला मान राखाल. राजकीय संपर्कातून लाभ होईल. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल.
कन्या:-
कामाचा ताण वाढता राहील. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या शोधात असणार्यांना दिलासादायक दिवस. व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.
तूळ:-
आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जवळचा प्रवास घडेल. हसत खेळत वागणे ठेवाल. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृश्चिक:-
नातेवाईकांना नाराज करू नका. दिवस माध्यम फलदायी असेल. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे.
धनू:-
नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. विरोधक नरमाईची भूमिका घेतील. नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील.
मकर:-
समोरच्या व्यक्तीची साशंकता दूर कराल. आहाराची पथ्ये पाळावीत. धार्मिक बाजू भक्कम कराल. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.
कुंभ:-
नवीन ओळखी वाढवाव्यात. भागीदारीतील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या. मनातील इच्छा पूर्ण होतील. संयमाने कार्यरत राहाल. अचानक प्रवास संभवतो.
मीन:-
जुनी व्यावसायिक कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्च दूर ठेवा. मुलांच्या जबाबदार्या पार पडण्यात दिवस निघून जातील. काही कुरबुरी चर्चेतून दूर कराव्यात. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.