जळगाव, प्रतिनिधी । रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य, मदत गरजूंपर्यंत पोहचवा. गरजूंना मिळालेल्या सुविधेमुळे त्यांच्या चेहऱ््यावरील समाधान आणि दुसऱ््यांसाठी काही तरी चांगले काम केल्याचा आनंद वेगळाच असतो. या सामाजिक कार्याच्या सुखा, समाधानाचे धनी व्हा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईलाइटच्या ऑफिशियली क्लब व्हिजिटप्रसंगी प्रांतपाल रमेश मेहर (नाशिक) यांनी केले.
हा समारंभ मायादेवीनगरातील रोटरी सभागृहात झाला. व्यासपीठावर मेहर यांच्यासह सहाय्यक प्रांतपालक विष्णू भंगाळे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर उपस्थित होते. प्रांतपाल मेहर यांनी जळगाव दौऱ््याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव ईलाइटला भेट दिली. त्यांनी या क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. मेहर यांनी क्लबच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पदाधिकारी यांचा गौरव केला. तर नूतन सदस्य व रोटरी क्लब जामनेर ईलाइट या सॅटेलाइट, चॅर्टर क्लबचे अध्यक्ष डॉ.अमोल सेठ यांच्यासह नूतन पदाधिकारी यांचे स्वागत केले. जामनेरचा सॅटेलाइट क्लब सुरू करण्याचा पहिला बहुमान रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये नाशिक ते नागपूर दरम्यान मिळाला आहे.
क्लबचा विस्तार होणार
मेहर यांनी बेनिफिट टू बेनिफिशरी, नाॅन रोटरी ऑर्गनायझेशनचा सहभाग, प्रत्येक प्रोजेक्टमधील पुढील रिसोर्स, पब्लिक टू इमेज बिल्ट व्हावी, पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी लोकवर्गणी आदीसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच पोलिओ निर्मूलनासाठीच्या जागतिक चळवळीसाठी सढळ हस्ते आर्थिक मदत करा, असे आवाहन केले. ‘रोटरी बुलेटन’ चे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते झाले. क्लबच्या कार्याची माहिती नितीन इंगळे यांनी दिली. तसेच त्यांनी सहकाऱ्यांच्या वतीने सॅटेलाइट क्लबच्या विस्ताराची ग्वाही दिली. डॉ.गोविंद मंत्री यांनी मेहर यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन श्रीराम परदेशी यांनी केले. आभार डॉ.पंकज शहा यांनी मानले. या वेळी डॉ.वैजयंती पाध्ये, चारू इंगळे, काजल असोदेकर, ‘रोटरी बुलेटन’ च्या प्रमुख भारती चौधरी आदी उपस्थित होत्या.