जळगाव, प्रतिनिधी । ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने अटक करण्यात आली आहे व त्या दोघा चोरट्यांकडून तीन ट्रॉल्या हस्तगत केल्या आहे.
दोघे संशयितांची नावे गोपाल उर्फ विशाल अशोक पाटील वय २९ रा. खंडेराव नगर, जळगाव व फैजलखान असलम खान पठाण वय २१ हे दोघांना अटक केली आहे. दोघांकडून तीन ट्रॉल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ट्रॉली चोरीच्या घटनांची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गंभीर दखल घेतली होती. तसेच शेतकर्यांना त्यांच्या ट्रॉल्या परत मिळवून देण्याच्या सुचना व आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधारक अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील, परेश महाजन, हरिष परदेशी, अशोक महाजन, भारत पाटील व विजय चौधरी यांचे पथक नियुक्त केले होते. फैजलखान व गोपाळ पाटील हे दोघेही वाळू व्यावसायिक अवैधपणे वाळुच्या चोरीसाठी ट्रॉल्या चोरी असल्याचे समोर आल्यानंतर पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या.
दोघांनी गुन्हयाची कबूली दिली असून त्यांच्याकडून धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्हे व एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक अशा तीन गुन्ह्यांमधील तीन ट्रॉल्या हस्तगत केल्या आहेत. दोनही संशयिताविरोधात वाळूचोरीचेही गुन्हे दाखल आहेत.