जळगाव, प्रतिनिधी । शहरातील स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणाहून मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित चोरट्यांना पारोळा येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघे संशयित चोरट्यांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या प्रकरणी दोघे संशयित चोरट्यांचे नाव समोर आली आहे. चेतन योगेश पाटील वय २२ सागर रविंद्र पाटील वय १९ दोन्ही रा. शनिमंदिर चौक, पारोळा अशी दोघा संशयितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणून संशयितांना अटक करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाटील, जयंत चौधरी, सुनील दामोदरे, दिपक पाटील, संदीप साळवे, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील व सचिन महाजन यांच्या पथक नियुक्त करण्यात आले होते.
पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना सोमवारी, पारोळा येथील चेतन पाटील हा रेकार्डवरील संशयित चोरीचे मोबाईल विक्रीसाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने चेतन याला ताब्यात घेतले, त्याने सागर पाटील याच्यासोबत गुन्हे केल्याची कबूली दिल्यावर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून अमळनेर व भडगाव येथे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान संशयितांविरोधात दुचाकीचोरीचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.