जळगाव – पी.एम.ई.जी.पी, सी.एम.ई.जी.पी, मुद्रा लोण कर्ज योजना संदर्भात आढावा बैठक खा.रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालय येथे पार पडली.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पी.एम.ई.जी.पी, सी.एम.ई.जी.पी. तसेच मुद्रा लोण ह्या योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले की बँकधिकारी कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करतात असे ग्राहकतक्रार मंच अधिकारी यांनी लक्षात आणून दिले असता खा.रक्षाताई खडसे यांनी बँकधिकारी याना सूचनांचे योग्य प्रकारे पालन करावे अश्या सूचना देण्यात आल्या. तसेच ग्राहकमंच अधिकारी व जिल्हा उद्योजक अधिकारी यांच्या 3 ते 4 महिन्यातून बैठक घेऊन संबधीत समस्यांवर निवारण करावे असे निर्देश देण्यात आले. कर्ज घेतलेले ग्राहक कर्जाची रक्कम हप्त्याच्या माध्यमातून व्यस्थित परतवा करतात की नाही याविषयी आढावा घेतला.
तसेच कर्जासाठी आवेदन केलेल्या नवउद्योजकांना कर्ज नामंजूर करण्याचे ठोस करण एस.एम.एस द्वारे कळवण्यात यावे जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सदर बैठकीस जिल्हाधिकारी बुलढाणा श्री.एस.रामामुर्ती,अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री.नरेश हेडाऊ जिल्हा ग्राहक तक्रार मंच अधिकरी श्री.अंधारे साहेब, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योजक अधिकारी श्री.पाटील साहेब इतर बँक अधिकारी प्रतिनिधी व नवउद्योजक हजर होते.