जळगाव – कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहे पण शिक्षण सुरू आहे. शिक्षक सुद्धा ऑनलाईन माध्यमातून अध्यापनाचं काम करीत आहेत. दि.5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.
त्या निमित्ताने रवी पाटील गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात पालक शिक्षक शाळेचे आयोजन केले होते. त्यामध्ये पालकांनी मराठी, गणित , इंग्रजी, योगा , शारीरिक शिक्षण व कार्यानुभव , परिसर अभ्यास, संगणक या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन केले काही प्रात्यक्षिक ही विद्यार्थ्यांकडून करून घेतले गेले. एक दिवस पालकांनी प्रत्यक्ष ऑनलाइन माध्यमातून आनंददायी अध्यापनाचा अनुभव घेतला.
यांत शिक्षक म्हणून नलिनी देवरे, अंजली चौधरी, आशा गरुड , शितल चौधरी, नीलिमा कोलते, संगिता बाविस्कर ,दिपाली सोमवंशी, सुलोचना पाटील, दुर्गा कुलकर्णी ,अरविंद पाटील , संदीप केदार ,वृषाली चौधरी, प्रियंका देसले या पालकांनी अध्यापनाचे कार्य केले हा सर्व कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिभ्रम घेतले.