Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

by Divya Jalgaon Team
September 3, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 37 अर्ज दाखल

lokshahi din

जळगाव – प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आणि सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघातर्फे जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 25 सप्टेंबर, 2021 या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात लोक अदालत होईल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. ए. के. शेख, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आदींचे सहकार्य लाभणार आहे.

या लोकअदालतमध्ये मोटार वाहन वाहतूक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले, व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे, असे खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवता येतील. याशिवाय राष्ट्रीयकृत बँका, कंपनी, मोबाईल कंपनी, दूरध्वनी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचकडील तडजोड योग्य प्रकरणेदेखील लोकअदालतीत सादर करण्यात येणार आहेत.

तरी ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा संबंधित पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आली आहे. याचा संबंधितांना लाभ घेऊन या लोकअदालतीत जास्तीत जास्त खटले सामोपचाराने निकाली काढून घ्यावी. असे आवाहन सचिव श्री. शेख यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: #Court#dr. pankaj ashiya#lokshahi adalat
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३ सप्टेंबर २०२१

Next Post

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावे- जिल्हाधिकारी

Next Post
यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावे- जिल्हाधिकारी

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावे- जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group