Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

१० लाख रुपये हुंडा न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी

by Divya Jalgaon Team
November 2, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

रावेर –   १० लाख रुपये हुंड्याची मागणी करत  झालेला साखरपुडा मोडून लग्नास नकार देणाऱ्या मुंबई येथील चौघांसह वरपक्षाकडील पाच जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला .

विश्रामजिन्सी येथील चरणसिंग पवार यांच्या मुलीचा कल्याण येथील सुदर्शन चव्हाण याच्याशी ३ नोव्हेंबर २०१९ रोजी साखरपुडा झाला होता . त्यावेळी लग्नाची तारीख ठरवली होती . मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने लग्न होऊ शकले नाही .

त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सुदर्शन चव्हाण , भालचंद्र चव्हाण , रितेश चव्हाण , अनिता चव्हाण ( सर्व रा.सुंदर कॉम्प्लेक्स , गौरीपाडा , कल्याण पश्चिम , जि.ठाणे ) व नामोबाई राठोड ( रा.मालेगाव रोड , चाळीसगाव ) यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क साधून लग्नाची तारीख ठरवण्याबाबत विचारणा केली . त्यावेळी त्यांनी १० लाख रुपये हुंडा द्या , तरच आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू असे सांगितले . हुंडा न दिल्याने झालेला साखरपुडा मोडून टाकला .

साखरपुड्यात सुदर्शन चव्हाण याला दिलेले २५ ग्रॅम सोने व साखरपुड्याचा २ लाख ५६ हजार रुपये खर्च परत करावा , अशी मागणी मुलीच्या वडिलांनी चव्हाण कुटुंबियांकडे केली . मात्र सोने व खर्च परत देणार नाही असे म्हणत चव्हाण कुटुंबाने चरणसिंग पवार यांना शिवीगाळ केली . चव्हाण कुटुंबाने फसवणूक केल्याने मुलीचे वडील चरणसिंग पवार यांनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

Share post
Tags: १० लाख रुपये हुंडा न दिल्यास लग्न मोडण्याची धमकीCrime newsJalgan Crime newsJalgaon newsRaver News
Previous Post

भाजपचे कार्यकर्ते नाराज- एकनाथराव खडसे

Next Post

स्वयंसेवी संस्थांच्या मागण्या पूर्ण कराव्यात- शिवतेज प्रतिष्ठान

Next Post
स्वयंसेवी संस्थांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात- शिवतेज प्रतिष्ठान

स्वयंसेवी संस्थांच्या मागण्या पूर्ण कराव्यात- शिवतेज प्रतिष्ठान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group