पाचोरा – पाचोरा येथे सराफाव्यवसायिक ज्वेलर्स सोन्यावर हॉलमार्किंग प्रक्रियेच्या विरोधात आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
त्याप्रसंगी पाचोरा सराफ असोशियन चे अध्यक्ष सुरेश रूपचंद देवरे यांनी सांगितले कि आम्ही हॉलमार्कचा स्वागत करतो परंतु अव्यावहारिक पद्धतीने लागू केलेल्या हॉलमार्किंग पद्धतीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर ज्वेलर्स सराफा व्यवसायिक (B ISC) ब्युरो इन्वेस्टीगेशन स्टॅंडर्ड नुसार काही त्रासदायक व जाचक प्रक्रिया सराफांवर लादण्यात आलेल्या आहेत.
ते पुढील प्रमाणे…..
व्यावसायिकांकडे जितके अलंकार सोन्या-चांदीचे आहेत त्याची नोंद ठेवावी लागणार आहे त्यापेक्षा जास्त वस्तू सापडल्या तर संबंधितावर कारवाई केली जाऊ शकते तसेच ज्वेलर्सचे कोणते ओळख चिन्ह नाही व दागिन्यांची सुरक्षितता नाही त्याचप्रकारे सोन्यावर हॉलमार्क केल्यानंतर दागिन्यांमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.
अशा जाचक अटी मान्य नसल्यामुळे आज सर्व सोनार सुवर्ण कारागीर व ज्वेलर्स मालकांनी आपापली दुकाने बंद ठेवून महात्मा गांधी चौक पाचोरा येथून सकाळी ११ वाजता हाताला काळ्या फिती बांधून मूक मोर्चा काढण्यात आला असून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सरळ (प्रांत अधिकारी कार्यालय) उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन संपन्न करण्यात आला.