जळगाव, प्रतिनिधी । दि.जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशिकांत बियाणी, उपाध्यक्षपदी विष्णूकांत मणियार व सचिवपदी सुनील तापडिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी दीपक महाजन, उपसचिव प्रफुल्ल दहाड, कोषाध्यक्षपदी राजेंद्र जोशी, तर सदस्यपदी अशोक राठी, सुनील जाखेटे, संजय शहा, रवींद्र सूर्यवंशी, जितेंद्र काबरा, मांगिलाल जैन, जगदिश वाणी, जितेंद्र फालक, वासुदेव पाटील, प्रीतेश जैन, किशोर करवा, वासुदेव बेहेडे, प्रमोद झंवर यांचा समावेश आहे.