Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

आतापर्यंत ७०० जणांनी घेतले प्रशिक्षण

by Divya Jalgaon Team
August 20, 2021
in राज्य
0

मुंबई, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.

यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्व विभागाची सर्व  पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याशी ०२२-६२९४८८१७ या क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे. http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षीत जिल्ह्यांचे अधिवासीत रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ५०० रुपये इतके आहे.

उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि १८ ते ४० वयोगटातील असावा. उमेदवार ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावे, अशा काही अटी या प्रशिक्षणासाठी आहेत, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

Share post
Previous Post

यावल तालुक्यातील सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

Next Post

सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा काॅग्रेस चा अभिनव उपक्रम कॉंग्रेस आपल्या दारी

Next Post
सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा काॅग्रेस चा अभिनव उपक्रम कॉंग्रेस आपल्या दारी

सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा काॅग्रेस चा अभिनव उपक्रम कॉंग्रेस आपल्या दारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group