Thursday, March 12, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुपन प्रणालीमुळे दिव्यांग प्रमाणपत्र कार्यवाही झाली सोपी

रांगेतील त्रास, गैरसोय, धक्काबुक्कीपासून मुक्ती

by Divya Jalgaon Team
August 18, 2021
in आरोग्य, जळगाव
0
कुपन प्रणालीमुळे दिव्यांग प्रमाणपत्र कार्यवाही झाली सोपी

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी १८ ऑगस्ट रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. दिव्यांग बांधवांची दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीला चांगला उदंड प्रतिसाद लाभला आहे. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. आता सप्टेंबर महिन्यातील पाचही बुधवारची कुपन संपली असून शुक्रवारी २० ऑगस्टपासून बुधवार दि. ६ ऑक्टोबरचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येणार आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २८ जुलै २०२१ पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. ज्या दिव्यांग बांधवानी १८ ऑगस्टचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि मर्यादित झाली.

डोळ्यांनी दिव्यांग बांधवांना तपासणी नेत्रकक्षात करण्यात आली. पूर्वी डोळ्यात ड्रॉप टाकण्यासाठी बसावे लागे. आता खाटा उपलब्ध झाल्याने नेत्रकक्षात रुग्णांना झोपण्याचीदेखील व्यवस्था झाली. उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ.प्रसन्ना पाटील, डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा भंगाळे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. डॉ. नवीन सोनवणे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, अनिल निकाळजे, विशाल दळवी, आरती दुसाने, भूषण निकम, वाल्मिक घुले, विकास राजपूत, प्रकाश पाटील, अजय जाधव, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

उत्तम नियोजन, चोख व्यवस्थापन
“सकाळी दिव्यांग बांधवांची नेहमी होणारी गर्दी दिसली नाही. कुपन प्रणालीमुळे ज्यांना आजची १८ रोजीची तारीख मिळाली होती, त्यांनी कुपन दाखवून तपासणी केली. कुपन प्रणाली यशस्वीरीत्या राबविली गेली, तसेच योग्य व्यवस्थापन केले म्हणून मंडळाच्या कार्यकारिणीसह कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे.”
– अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून वैद्यकीय अधीक्षक कक्षातून बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

अशी आहे बुकिंग कुपन प्रणाली
दर बुधवारी २०० दिव्यांगांची तपासणी होणार आहे. दिव्यांग बांधव अथवा त्यांचे नातेवाईक यांनी संकेतस्थळावरील डाउनलोड केलेला फॉर्म व दिव्यांग बांधवाचे ओळखपत्र दाखवून दिव्यांग बोर्डात पडताळणी करावी. नंतर रुग्णालयाच्या कक्ष क्रमांक ११४ बी मध्ये वैद्यकीय अधिकारी कक्षात कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत कुपन प्राप्त करू शकतात. आता डोळ्यांनी दिव्यांग बांधवाना तारखेचे कुपन दाखवून नेत्रकक्ष (आय वॉर्ड) येथेच केसपेपर देखील मिळेल व वैद्यकीय तपासणीदेखील होणार आहे. तर मानसिक दिव्यांग सोडून इतर दिव्यांग असलेल्या बालकांना कूपनची आवश्यकता नाही.

Share post
Previous Post

लोकसहभागातून खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, १९ ऑगस्ट २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, १९ ऑगस्ट २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group