Thursday, March 12, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

६० हजार जळगावकरांनी केले भारतमाता प्रतिमेचे पूजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त: अभाविपने राबवले ११० गावात ३५ उपक्रमभारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त: अभाविपने राबवले ११० गावात ३५ उपक्रम

by Divya Jalgaon Team
August 18, 2021
in जळगाव
0
६० हजार जळगावकरांनी केले भारतमाता प्रतिमेचे पूजन

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशातर्फे हर घर तिरंगा – घर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सुमारे साठ हजार नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. या अभियानात जिल्ह्यात सर्वत्र ध्वजारोहण, तिरंगा फेरी, भारत माता प्रतिमापूजन, घरावर तिरंगा ध्वज लावणे, वृक्षारोपण, शहीद वंदना, वीरमाता वीरपत्नी सत्कार,असे उपक्रमही पार पडले.

जळगाव अभाविपच्या वतीने जिल्ह्यातील ८ तालुक्यात ११० गावात १२१२० घरात भारत माता प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली. या अभियाना अंतर्गत साठ हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमा पूजनात सहभाग घेतला.

या उपक्रमामुळे बस स्थानक, ट्राफिक सिग्नल, महाविद्यालये, कार्यालय, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, गणेश मंडळे या ठिकाणी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले. यामुळे शालेय विद्यार्थ्यी व नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला. जळगाव जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक ठिकाणी ध्वजारोहन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हे अभियान अभाविपने भारत भर राबवले. त्याचप्रमाणे या अभियानात जळगाव मध्ये ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, मशाल यात्रा, परिषद की पाठशाला याठिकाणी वेशभूषा यात्रा, १६५ चौकात समोहिक भारत माता पूजन, ध्वजारोहण करण्यात आले. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी १०० विद्यार्थी ६४ विद्यार्थिनी पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती अभियान जिल्हाप्रमुख इच्छेश काबरा व आकाश पाटील यांनी दिली.

Share post
Previous Post

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी चिंचोली येथील मेडिकल हबचा मार्ग मोकळा

Next Post

लोकसहभागातून खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण

Next Post
लोकसहभागातून खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण

लोकसहभागातून खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group