मुंबई, वृत्तसंस्था । मुंबई हायकोर्टानं इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द केली. त्यानंतर आता राज्याच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नवा निर्णय घेतला आहे. इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया आता सुरू झाली असून एमएमआरडीए विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून ११ वी प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली आहे यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातील ११ वी प्रवेश प्रकिया सुरू झाल्याचं सांगितलं आहे.