जळगाव, प्रतिनिधी । रोटेरियनच्या दातृत्त्वभावामुळे अंध-दिव्यांग बांधवांना साधारणत: महिनाभराचे किराणा साहित्य मिळाल्याने त्या गरजूंना दिलासा मिळाला. या सामाजिक उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला. या अंध-दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे अंध-दिव्यांग बांधवाना किराणा साहित्याचे वितरण गणपतीनगरातील रोटरी हाॅलमध्ये करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लब जळगाव ईस्टचे अध्यक्ष वीरेंद्र छाजेड,
जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अमित भोईटे, क्लबचे माजी अध्यक्ष विनोद पाटील-भोईटे आणि क्लबचे संग्रामसिंग सूर्यवंशी उपस्थित होते.
नैसर्गिक उणिवांमुळे अंध-दिव्यांगांवर अन्याय झाला. पण, त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या समस्या सोडवण्याची जवाबदारी विविध संस्था, संघटना व समाजातील दात्यांचीसुद्धा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे अंधबांधवांचे देखील मोठे हाल झाले. अनेक जण रेल्वेत खेळाचे साहित्य विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु, मध्यंतरी रेल्वे बंद असल्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे त्यांना किराणा साहित्य वाटप करण्यात येत असल्याचे विनोद
पाटील-भोईटे यांनी सांगितले. अंधबांधवांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातूनही भरीव कार्य होणे आवश्यक आहे. रोटेरियन व दात्यांची दातृत्त्वाची भावना आशादायक आहे. या मदतीमुळे त्यांच्या चेहर्यावरील समाधानामुळे मन भरुन येते, असे मत अमित भोईटे यांनी
व्यक्त केले. क्लबचे अध्यक्ष वीरेंद्र छाजेड यांनी विविध सामाजिक, पर्यावरण विषयक राबविलेल्या उपक्रमांची मा
हिती दिली. तसेच आगामी प्रकल्पांची माहिती दिली. अंध-दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देता आला, यामुळे खूप मोठे समाधान मिळाले, असे त्यांनी सांगितले. योग्य गरजूंची सेवा व पुण्याचे कार्य करण्यांची संधी मिळाली.
त्यांच्यापर्यंत मदत पोहचविणे हे सर्वांचे कर्तव्य होते, असे मत संग्रामसिंग सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी संजय शहा, जिनेंद्र जैन, दिनेश कक्कड, अभिजीत पाटील, पूजा अग्रवाल, संजय गांधी, अमित शर्मा, जयेश ललवाणी, डॉ.राहुल भंसाळी, विनोद रामचंदानी, प्रीतेश चोरडिया यांचे सहकार्य लाभले. या वेळी राजेश साखला, डॉ.जगमोहन छाबडा, राजेश मुणोत, जिनेंद्र जैन आदी उपस्थित होते.