मुंबई : इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस व्हाट्सअँप Whatsapp लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये मेसेज डिलीट करण्यासाठीचं (Disappearing messages) एक नवीन फिचरही आहे. यामध्ये कोणताही मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत त्यांच्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे.WhatsApp मध्ये आता आले नवीन फिचर.
तासभर ट्विटरचा सर्व्हर डाऊन; युजर ट्विट टाकून टाकून थकले
WhatsApp Support पेजवर दिलेल्या माहितीनुसार Disappearing messages असं या फिचरचं नाव आहे. हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर असे मेसेज पाठवू शकतो जे सात दिवसात आपोआप डिलीट होतील. या फिचरचा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप चॅट दोन्ही सेक्शनमध्ये वापर करता येईल. हे फिचर एकदा इनेबल केल्यानंतर कोणालाही केलेला मेसेज किंवा ग्रुपमध्ये केलेला मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल. परंतु या फिचरचा जुन्या मेसेजेसवर किंवा आलेल्या मेसेजेसवर (received message) कोणताही परिणाम होणार नाही.
असे असेल नवीन फिचर
युजरने सात दिवस व्हाट्सअँप उघडलं नाही तरीदेखील मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रिव्ह्यू किंवा नोटिफिकेशनमध्ये मेसेज दिसेल.
Disappearing मेसेजला कोट करुन जर त्यावर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मेसेज डिलीट होणार नाही. Disappearing मेसेज कोणालाही फॉरवर्ड केला असेल, परंतु ज्याला मेसेज फॉरवर्ड केलाय त्याच्यासाठी Disappearing मेसेज ऑफ असेल तर फॉरवर्डेड मेसेज डिलीट होणार नाही. कोणत्याही युजरने मेसेज Disappear होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतला असेल तर तो मेसेज बॅकअपमध्ये राहील.
त्यामुळे तो मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल, परंतु तो युजर जेव्हा बॅकअप रिस्टोर करेल, तेव्हा तो मेसेज त्याच्याकडे पुन्हा दिसेल. Disappearing मेसेज फिचर ऑन केल्यानंतर चॅट मेसेजप्रमाणे मीडिया फाईल्सदेखील डिलीट होते . मात्र जर त्या फाईल डाऊनलोड केल्या असतील तर त्या फोनमध्ये तशाच राहतील.
अजून वाचा
चक्क! आता व्हॉट्सअॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग