पाचोरा, प्रतिनिधी । येथील गो.से. हायस्कूलला क्रांतिसिंह नाना पाटील जयंती मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ, पर्यवेक्षक आर. एल.पाटील, एन. आर.ठाकरे आणि ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.