जळगाव – सेनापती चांगला असेल तर सैन्यही त्याच्या पाठीमागे भक्कम उभे राहतात याचा परिणाम म्हणून त्यांना विजय मिळत असतात. मात्र अनेक सेनापती आणि मोजके सैन्य त्यातही सैन्यामधील प्रत्येकाला सेनापती स्वत:च्या स्वार्थासाठी वेगळी वागणूक देत असेल तर ते सेनापती आणि सैन्यही दाणाफाण होत असते.
मुरब्बी राजकारणी सेनापती असल्यावरही त्यांना गड सर करणे शक्य होत नाही अशीच काहीशी अवस्था जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये झालीय असे म्हणणे संयूक्तीत होईल. भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आल्यानंतर पक्षाला बळकटी येईल असे वाटत होते. मात्र ईडीला उत्तर देण्यातच एकनाथराव खडसेंचा वेळ जात असल्याने ते तितकेसे सक्रिय दिसत नाही. शिवाय जळगाव शहरात तर नेत्यांमध्येच उभी फट असल्याचे दिसून येत आहे.
अलिकडेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील राष्ट्रवादीतील नेत्यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम घेऊन आपल्यात यादवी असल्याचे जाहिरपणे दाखवून दिले. पक्षात पुन्हा सक्रिय झालेले विनोद देशमूख आणि मनोज वाणी यांनी जाहिरातबाजीतून शहरात सक्रिय असल्याचे दाखवून दिले. त्यात ते यशस्वीसुद्धा झाले कारण दोघांनी दिलेली जाहिरात, लावलेले बॅनर, होर्डींग हे शहरातच नव्हे तर राज्यभर चर्चेचा विषय ठरली. मुंबईला जाऊन दोघांनी अजितदादांची भेट घेऊन त्यांच्याकडून वाहवाह मिळवून घेतली.
दुसरीकडे अभिषेक पाटील व त्यांचा आई कल्पना पाटील यांनी सोशल मिडीयामधील एका व्हॉटस्पॉट गृपवर ‘आपल्यामधील प्रस्थापित नेते खालच्या स्थरावरील राजकारण करतात नेते आले की बॅनरबाजी करतात. स्वत:ला नेते समजायचे आणि निवडणूक आली की विरोधकांशी हातमिळविणी करायचे, पैसे खायचे आणि पवार साहेबांना फसवायचे.’अशी पोस्ट व्हायरल केली होती तसेच ज्यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायत आणता येत नाही तेच जास्त बोटे घालतात. स्वत:च्या मतदारसंघात शून्य किंमत आहे ते स्टेजवर असतात भाजपचे काम करतात आणि नेत्यांच्या गाडीत बसतात‘ असे सांगत आपण प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत असल्याचे त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. त्यामुळेच या दोंघाकडे राष्ट्रवादीचे नेत्यांनी लक्ष देणे बंद केले असावे तसेच त्यांना अजितदादांच्या वाढदिवसांनिमित्त झालेल्या कार्यक्रमांत ही बोलवले नसल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे या पोस्ट वरून आणि अजितदादांच्या वाढदिवसांनिमित्त झालेल्या कार्यक्रमांवरून पक्षात उभी फुट पडली असल्याचे दिसते. यामुळे कार्यकर्त्यांची मोठी अडचण होत आहे. एकाच दिवशी वेगवेगळे कार्यक्रम तेही एकाच वेळेला आणि दुसऱ्या गटात का गेला मी बोलवले तु तिकडे गेला असे सांगत कार्यकर्त्यांची गोची नेत्यांकडूनच केली जात आहे. विनोद देशमुख यांच्या प्रवेशाच्या दिवशी माजी मंत्री सतीश अण्णा यांनी सांगितले की, जास्त उत्साहाच्या भरात देशाचे पंतप्रधान यांच्या बॅनरवर काही कार्यकर्त्यांनी पेट्रोलच्या दरवाढ होत असल्याने शाई फेकली होती तर ते चुकीचं आहे असे अभिषेक पाटील यांच्या नाव न घेता सांगितले.
हे आंदोलन डी–मार्ट जवळील पेट्रोल पंपावर अभिषेक पाटील यांच्या नेतृत्त्वाखालीच झाले होते. त्यामुळे सतिष अण्णांनी अभिषेक पाटील यांना तर टोला लगावला नसेल ना हाही प्रश्न उपस्थित होत आहे. गुलाबराव देवकर यांनी नुकतेच सांगिलते होते कि राष्ट्रवादीत गट बाजी नाही असे असले तरी अभिषेक पाटील तसेच त्यांची आई हे पक्षाचे पदाधिकारी यांच्या विरोधात कट रचत असल्याची वावडी उटवली जात आहे मनमानी चालवणाऱ्याकडे लक्ष देणे बंद केले.
काही महिन्यापूर्वी जयंत पाटील संवाद यात्रा निमित्त दौरावर आले आले होते त्यावेळी त्यांनी कल्पना पाटील यांना खडे बोल सर्वांसमोर सुनावले होते याचा राग कल्पना पाटील, अभिषेक पाटील यांना आला होता. यातूनच राष्ट्रवादीच्या एका ग्रुपवर अभिषेक पाटील यांनी काही कारणाने ग्रामपंचायत आणता येत नाहीत तेच जास्त बोटे घातलात असे सांगितले तसेच ‘स्वत:च्या मतदारसंघात शुन्य किंमत आहे ते स्टेजवर असतात … जे स्वतः दोन लोक आणू शकत नाहीत आणि ते जे भाजपचे काम करतात ते अध्यक्षाच्या गाडीत असतात …. आपण प्रामाणिक काम करतो आणि पुढे पुढे करत नाही म्हणून कदाचित असा घडते .. आपल्या सोबत पण पण आणि पण….. आता यांच्या आईला ओपन घोडे लावणार‘ अशी भाषा पक्षातील नागरिकाबद्दल सार्वजिक ठिकाणी वापरणे राष्ट्रवादीच्या संस्कृतीला धरून कितीपत योग्य आहे, हा चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे गुलाबराव देवकर जरी म्हणत असले की पक्षात गटबाजी नाही परंतू प्रत्यक्षात पक्षात वेगळे चित्र आहे ही वस्तूस्थिती आहे. असे असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीचे आकडे कसे वाढतील. पक्ष कसा मजबूत होईल का फक्त नेत्यांपूरताच आणि नेत्यांसाठीच पक्ष असेल काय? असे अनेकांधिक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
त्यासाठी राष्ट्रवादीमधील सर्व सेनापतींनी वैयक्तिक उणी–दुणी बाजूला ठेऊन फक्त पक्षासाठी काम केले पाहिजे असे सांगण्यासाठी जयंत पाटीलांना जळगावात यावे लागले होते जाहिरपणे बोलूनही शहरातील पदाधिकारी आपल्या पक्ष आचरणात सुधारणा करत नसतील तर शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे स्थान काय असेल हे सांगणे न बरे….