मेष:-
घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल.
वृषभ:-
नवीन कामात हात घालावा. जमिनीच्या कामात यश येईल. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल.
मिथुन:-
कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांसाठी खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा.
कर्क:-
नवीन ओळखीतून कामे होतील. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल.
सिंह:-
मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. कामात काही बदल करावे लागतील. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील.
कन्या:-
कौटुंबिक ताण हलका करावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी.
तूळ:-
घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत.
वृश्चिक:-
जिभेवर ताबा ठेवावा, अन्यथा मन खिन्न होऊ शकते. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
धनू:-
मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे.
मकर:-
आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल.
कुंभ:-
अधिकार्यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा.
मीन:-
सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल.