पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा शहर शिंपी समाज अध्यक्ष व उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुर्यकांत देविदास निकम यांचे चिरंजीव विजय यांचे आय.आय.टी.हैदराबाद येथे स्ट्रक्चरल इंजिनियरिंग मधील एम.टेक. साठी निवड झाली.
विजयन यास तिरूपती, मंडी, रोपर, पाटणा, जम्मू, जोधपुर, भुवनेश्वर, इंदोर तसेच एन.आय.टी.सुरथकल (कर्नाटक) येथिल सुध्दा ऑफर आल्या होत्या. एल अँड टी कंपनी तर्फे घेतलेल्या स्पाॅंसरशिप परिक्षेत ही यश मिळवुन क्वालिफाय झाला होता.
विजयन यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. विजयन याने पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधुन सिव्हील इंजिनियरींग मध्ये विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली आहे.विजयनचे दि.१६ ऑगस्ट पासून नियमित कॉलेज सुरू होणार असून ते १० ऑगस्टला हैदराबादसाठी रवाना होणार आहेत.