जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुर भागांमधील बिलाल चौक येथे अज्ञात चोरट्याने रोकड व मोबाईल लंपास केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील तांबापुर परिसरातील बिलाल चौक येथे राहणाऱ्या कलीम बेग रमजान बेग हे बकरी ईदच्या निमित्ताने आज सकाळी ५.३० नमाज करण्यासाठी घरातून बाहेर पडले. तर घरातील महिला या घराच्या गच्चीवर गेल्या होत्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील ५ हजार रुपयांची रोकड व अनुक्रमे ११ आणि ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी करीम यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.