चोपडा – चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री नाना पटोले व जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील यांच्या आदेशान्वये महागाईविरोधात जनजागृती करण्यासाठी ठिक ठिकाणी जाऊन लोकांना जागृत करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांकी असताना मोदी सरकार भरमसाट लूट करत आहे. एलपीजी सिलेंडर च्या किमती भरमसाठ वाढवीत आहेत. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस यांच्या किमती भरमसाठ वाढल्याने बाजारात प्रत्येक वस्तू महाग मिळत आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. जनता महागाईने त्रस्त झालि आहे .मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई भडकलेली आहे.
त्यासाठी चोपडा काँग्रेसने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर आसूड ओढले असून घराघरात पत्रके वाटली जात आहेत .तसेच कोरोनामुळे अनेक लोकांवर अनेक कुटुंबांवर खूप मोठे आघात झाले आहेत. कोरोणामुळे जनजीवनावर काय परिणाम झाला आहे याचा अभ्यास करण्यासाठी चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सर्वे केला जात असून त्यानुसार जनतेला योग्य ती मदत करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत म्हणून अहवाल तयार करण्यात येऊन प्रदेश काँग्रेसकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यासाठी चोपडा शहर व तालुका काँग्रेसने ठिकाणे कॅम्प लावून महागाईविरोधात पत्रक वाटप करणे व सर्वे करणे हे काम हाती घेतले आहे.
आज रोजी (दि.16जुलै) छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रके वाटून व फॉर्म भरून चोपडा शहर व तालुक्याचे पदाधिकारी यांनी मोहिमेला सुरुवात केली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजाबराव बापू पाटील, चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के .डी .चौधरी, चोपडा तालुका काँग्रेस समन्वयक प्राध्यापक नंदकिशोर सांगोरे ,चोपडा सुतगिरनिचे संचालक राजेंद्र पाटील,गोपीचंद चौधरी , देवकात चौधरी ,इल्यास पटेल आदींनी सह्भाग दिला.