जळगाव – केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल,डिझेल, एलपीजी गॅस खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाई ने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. या जीवघेण्या महागाई व इंधन दरवाढ विरोधात भाजप प्रणित केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगांव जिल्हा काँग्रेस कडून दि.१० रोजी सकाळी १०.३० वाजता काॅग्रेस भवन येथुन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सायकल रॅलीला काँग्रेस भवन येथुन सुरवात होऊन टॉवर चौक, नेहरूजींचा पुतळा, बस स्टॅण्ड,मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक, सिव्हिल हॉस्पिटल मार्गे पुन्हा काॅग्रेस भवन येथे च रॅली चा शेवट करण्यात आला. रॅली नंतर लगेच दि. १७ जुलै पर्यंत च्या आंदोलन कार्यक्रमा बाबत जिल्ह्यातील तालुका स्तरावर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी काॅग्रेस भवन येथे हाॅलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार श्री शिरीषदादा चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील डी.जी.पाटील माजी सरचिटणीस,मदन जाधव व्ही जे एन टी सेलचे प्रांत अध्यक्ष,आत्माराम जाधव मुक्ती हारून अल्पसंख्याक पदाधिकारी, प्रदिप पवार,माजी अध्यक्ष राजीव पाटील व उदय पाटील, प्रभाकर सोनवणे जि.प.सदस्य,अजबराव पाटील जिल्हा सरचिटणीस ,भगतसिंग पाटील इंटक अध्यक्ष, अविनाश भालेराव,शाम तायडे, योगेंद्रसिंग पाटील, डॉ.जगदीश पाटील,मुक्तगिर देशमुख,राजस कोतवाल , देवेंद्र मराठे,मनोज सोनवणे,जमील शेख ,अमजद पठाण,मनोज चौधरी,मुजीब पटेल,दिनेश पाटील,रवींद्र जाधव ,संजय राठोड,अनिल निकम,देवेंद्र पाटील, रतीलाल चौधरी,रविंद्र निकम,प्रदीप सोनवणे,adv अरविंद गोसावी,संजीव पाटील,adv राहुल पाटील, जाकीर बागवान,ज्ञानेश्वर कोळी, जगदीश गाढे,विष्णू घोडेस्वार,शशिकांत तायडे,भगवान मेढे,विवेक नरवाडे,योगेश देशमुख, अनिशा पटेल,नीरज बोराखेडे, दिपक सोनवण जलील पटेल,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.