भुसावळ – कोविड १९ मध्ये चांगले कार्य केले असेच सामाजिक उपक्रम हॉस्पिटल मार्फत राबविले म्हणून श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट, ट्रामा आणि डायलिसिस सेंटर भुसावळचे ‘ डॉ. नितीन पाटील’ यांना ४ जुलै रोजी मुंबई येथे यशवंराव चव्हाण सभागृहात देवदूत पुरस्काराने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , आरोग्यमंत्री राजेश टोपे, विजयसिंहराजे पटवर्धन,सांगली , विजय बाविस्कर समूह संपादक लोकमत , आशुतोष पाटील , संपादक न्यूज १८ लोकमत , विवेक गिरधरी, कार्यकारी संपादक दै. पुढारी मुंबई ,किरण जोशी म. रा. म. पत्रकार संघ , पंकज बिबवे , म. रा. म. पत्रकार संघ पुणे, डॉ. पी. एन कदम , व्यवस्थापकीय संचालक संकल्प यांच्या देवदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलचे डॉ. लक्ष्मीकांत नागला हे सुद्धा उपस्थित होते. सोहळा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि संकल्प केअर च्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या वेळी डॉ. लक्ष्मीकांत नागला यांनी आरोग्यमंत्री ना. राजेशजी टोपे यांना हॉस्पिटल विषयी व राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली
या कार्यक्रम प्रसंगी कोविड १९ मध्ये स्वतः ला झोकून सेवा देणाऱ्या २०, डॉक्टर( सरकारी व खाजगी ) , ९ सामाजिक सन्मान यात भुसावळ येथील अरुण रंधे, विशेष सन्मान ३ ( सरकारी अधिकारी ) , ४ पत्रकार यात मुळ भुसावळचे असलेले झी समूहाचे संदीप पारोळेकर यांना स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र , शाल देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
डॉ . नितीन पाटील यांना सन्मान देवदूतांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने सोमवार रोजी जळगाव जनता सरकारी बँकेचे संचालक जयंती सुराणा , वासुदेव इंगळे, जैन संघाचे सेक्रेटरी कांतीलाल चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते जे. बी. कोटेचा, राजेंद्र पाटील, राज साउंड , रिदम मेडिकलचे संचालक व श्री कल्याणी चॅरिटेबल चे संचालक गौतम चोरडिया, शिवसेना शहराध्यक्ष बबलू बर्हाटे, प्रा. धीरज पाटील शिवसेना तालुका संघटक,दीपक धांडे , अमोल पाटील , युवा सेनेचे सूरज पाटील , पवन नाले तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी रुग्णालयास भेट देऊन डॉ. नितीन पाटील यांचे अभिनंदन करून सन्मान केला.