मुक्ताईनगर – गत काही दिवसात पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या दारात सातत्याने वाढ होत असल्याने वाढलेल्या महागाई विरोधात आज मुक्ताई नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार हो गई फेल… महंगा गॅस महंगा तेल’ ‘मोदी है तो महेंगाई है’ या गगनभेदी घोषणात गॅस सिलेंडर आणि वाहनांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैया पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड रोहिणीताई खडसे, माजी आमदार अरुणदादा पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
यावेळी बोलतांना ॲड. रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस रडकुंडीला आला आहे. दळणवळणाच्या खर्चात वाढ झाल्याने सर्व वस्तू महागल्या आहेत. गॅस सिलेंडरचे दर दिवसागणिक वाढत आहेत ? सर्वसामान्यांना जगणे मुश्किल होऊ लागले आहे. आणि या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. या दरवाढीचा आम्ही निषेध करतो. लवकरात लवकर केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैया यावेळी म्हणाले की, मोदी सरकारने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असून केंद्र सरकार दररोज भाववाढ करण्यात मश्गुल आहे आम्ही या भाववाढीचा निषेध करतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेवर खालच्या भाषेत अश्लाघ्य शब्दात टीका करणाऱ्या आ. गोपीचंद पडळकर यांचाही निषेध केला गेला.
आंदोलनात गोटू सेठ महाजन, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, जेष्ठ नेते रमेश नागराज पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, सोशियल मीडिया अध्यक्ष शिवराज पाटील,प स सभापती सुवर्णा ताई साळुंखे,उपसभापती सुनीता ताई चौधरी,माजी सभापती दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजु माळी,भागवत पाटील,वसंत पाटील,किशोर चौधरी, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील सरचिटणीस रवींद्र दांडगे,कल्याण पाटील,सोपान दुट्टे, साहेबराव पाटील,युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख गजानन पाटील,युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी तालुका अध्यक्ष लता सावकारे ,सुनिल कोंडे,विशाल महाराज खोले,रावेर बाजार समिती संचालक पंकज येवले, सय्यद असगर ,सुधाकर जावळे, दिपक मराठे, लिलाधार पाटील, डॉ बी सी महाजन,अतुल युवराज पाटील,चंद्रशेखर बढे, प्रदिप साळुंखे,सुनिल काटे, विकास पाटील,रमेश खंडेलवाल, रवींद्र पाटील,बापू ससाणे, ओमप्रकाश चौधरी, रणजित गोयनका, प्रवीण पाटील,आमीन खान,रउफ खान,संदिप जावळे,सचिन महाले,गणेश तराळ, सुनिल पाटील,सपना चौधरी, माजी सभापती रंजना ताई कांडेलकर, प्राजक्ता चौधरी, मीनल चौधरी, निता ताई पाटील ,कावेरी वंजारी, वासुदेव बढे, प्रेमचंद बढे, विनोद काटे,सुभाष खाटीक, प्रकाश साळुंखे,अतुल पाटिल, विनोद महाजन,धनराज पाटील, पुरुषोत्तम पाटील, योगेश चौधरी,विलास काटे, ज्ञानेश्वर कोळी, संतोष पाटील, कचरु बढे, शेरदस पटेल, श्रीकृष्ण झांबरे, उमेश तायडे, सुकलाल कवळे, दिलीप चौके, वाल्मिक भोलाणकर विशाल नाना पाटील, वासुदेव जयराम चौधरी, संजय दगडु भोलाणकर, जगन्नाथ तायडे, संदीप भागवत जावळे, ललित आनंदा पाटील, अजमल गणपत चव्हाण, छोटु बन्सी चव्हाण, संतोष राठोड, बी.टी. महाजन, प्रविण पाटील दुई, राहुल राजेंद्र पाटील, अक्षय राजेंद्र सोनवणे, रुपेश माहुरकर,सुशील भुते,योगेश पुंजाजी चौधरी,योगेश राणे, विजय शिरोळे, संजय कपले, चेतन राजपुत, पंकज नामदेव चौधरी, विठ्ठल जोगी, धनजी इंगळे, सुनील पाटील,पंडित पालवे, सुनिल बाजीराव काटे, प्रभाकर पितांबर लढे,अतुल बढे, विनोद महाजन,प्रदीप भागवत साळुंके, विनोद कडु चव्हाण, बारसु गणपत खडसे, बाबुराव येरुकार, किशोर पाटील, आकाश भडांगे, वैभव बोंडे, भुषण राजेंद्र पंडित कापसे, विजय कापसे, राजेंद्र पाटील, कैलास कोळी, राजेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, सोनु पाटील, अरविंद पाटील, हरिसिंग परदेशी, चारुदत्त वानखेडे, अरविंद देशमुख, कुशल जावळे, अजय चौधरी, गौरव वानखेडे, भुषण पाटील बंटी जंगले, साई वानखेडे, प्रशांत तेली प्रसाद वानखेडे, प्रशांत बोंडे, प्रदीप ठाकुर, कैलास शंकर कोळी, चंद्रकांत चूडामण, पाटील, राजेंद्र आत्माराम पाटील, रवी राजु सुरवाडे, सुभाष निळकंठ सुळोकार, गोपाळ रामदास माळी, ज्ञानेश्वर जगन्नाथ, विनोद कडु महाजन, अतुल अशोक पाटील, योगेश वासुदेव पाटील, संदीप पुंडलिक पाटील, सुरेखा प्रल्हाद पाटील, विजय सोपान पाटील, सुपडु बोदडे, अनिल म्हसावे, सोपान नामदेव कोळी, शिवराज पाटील, धनराज श्यामराव मोरे, विलास झाल्टे, सुनिल ढाजळे, नामदेव राठोड, राजेंद्र लक्षण पाटील,मयुर साठे, भैय्या कांडेलकर, शंकर मोरे, शुभम खंडेलवाल, छगन राठोड,एच.एल.धनगर, वासुदेव दगडु, रविंद्र पाटील, मनोज हिवरकर, राजेश युवराज पाटील, सुपडु तापीराम बोदडे, तुषार रामदास, श्रीराम मोतीराम चौधरी, प्रणव चौधरी, नितेश राठोड, विवेक धाडे,अतुल राजगुरे, मोहन विठ्ठल चौधरी, मुन्ना बोंडे, अजय प्रकाश पाटील, सुनिल भागवत पाटील, डिगंबर पाटील, मोहन सुळरके, सारंग पाटील,संदिप गोपाळ पाटील, रविंद्र पांडुरंग पाटील, भागवत रामधन वाघ,अजय आढायके, पवन चौधरी, नंदकिशोर बेलदार, उज्ज्वल राणे, सचिन पाटील,बुलेष्ट्रीन भोसले,भरत पाटील, निलेश पाटील, रवी खेवलकर, विनोद कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते