जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा क्रिडा संकुलासमोरून ५३ वर्षीय प्रौढाच्या पिशवीतून रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महाबळ येथे पोलीस चौकीजवळ अविकुमार शंकरराव जोशी (वय-५३) हे रहायला आहेत. २९ जून रोजी सकाळी ९.३० वाजता कामानिमित्त जळगाव जिल्हा क्रिडा संकुलात आले होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने बँकेत भरण्यासाठी ५ हजार रूपयांची रोकड दिली होती. दरम्यान अनोळखी ५ महिलांनी त्यांच्या पांढऱ्या पिशवीतून पाच हजार रूपयांची रोकड लांबविले. याप्रकरणी अविकुमार जोशी यांनी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात पाच अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.