Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Corona : फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये दुसरा लॉकडाउन

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा केली

by Divya Jalgaon Team
November 1, 2020
in राष्ट्रीय
0
Corona : फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये दुसरा लॉकडाउन

युरोप, अमेरिकेत करोना विषाणूची दुसरी लाट आली आहे.  फ्रान्सनंतर आता इंग्लंडनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. थंडीमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमध्ये हॉटेल, दुकाणं आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत.

बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची विनंती व्हिडीओत करण्यात आली आहे. चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाउन संपवायचा किंवा वाढवायचा हे पाहिलं जाईल, असेही ट्विटमध्ये म्हटलेय.

जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही कारणास्तव घरातून बाहेर निघू नये. शक्य असल्यास घरुनच काम करावे. गरज नसल्यास प्रवासही टाळा, अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

यूरोपमध्ये करोनाची दुसरी लाट –

यूरोपमध्ये पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालाला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात येत आहे. गुरुवारी फ्रान्समध्ये लॉकडाउन घेण्यात आला आहे. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिसमध्ये आणि आसपास असणाऱ्या परिसरातील वाहतूक कोंडी किमीमध्ये मोजल्यास जवळपास ७०० किमी लांब वाहतूक कोंडी झाली होती. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हा लॉकडाउन एक महिन्यांसाठी लागू असणार आहे. यामुळेच गुरुवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन प्रभावी होण्याआधी सामान खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. याशिवाय विकेण्ड आल्यानेही अनेक लोक इतर ठिकाणी असणाऱ्या आपल्या घऱी जाण्यासाठी निघाले होते. यामुळेच ही स्थिती निर्माण झाली होती.

Share post
Tags: Corona : फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये दुसरा लॉकडाउनCorona NewsFranceInglandLockdownPM Boris JounsonSecound LockdownStart
Previous Post

काश्मीर हा केवळ जमिनीचा तुकडा नाही तर त्यापेक्षाही बरंच काही

Next Post

आजचे राशी भविष्य, रविवार, १ नोव्हेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशी भविष्य, रविवार, १ नोव्हेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group