जळगाव - येथील डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील कोविड वॉर्डासह म्युकरमायकोसिस वॉर्डाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देवून रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराचा आढावा घेतला. रुग्णालयातील उपचारासंबंधी जिल्हाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या दृष्टीने शासनाच्या निर्देशनानुसार डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
सद्यस्थीतीला या कक्षात ३५ रुग्ण उपचार घेत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतीच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली, या भेटीत त्यांनी म्युकरमायकोसिस वॉर्डाची पाहणी केली तसेच या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील त्यांनी संवाद साधला. रुग्णालयातील उपचारासाठीच्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान जिल्हाधिकार्यांनी स्त्रीरोग विभागाला देखील भेट दिली.
यांची होती उपस्थीती यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, डॉ.केतकी पाटील, एमडी मेडिसीन तज्ञ डॉ.पाराजी बाचेवार, नाक-कान-घसा तज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, व्यवस्थापक एन.जी.चौधरी, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.माया आर्विकर, डॉ.दिपीका लालवाणी आदि उपस्थीत होते.