Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबई मेट्रोमध्ये मोठी भरती। नोकरीची सुवर्णसंधी

by Divya Jalgaon Team
June 25, 2021
in राज्य
0
मुंबई मेट्रोमध्ये मोठी भरती। नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये (MMRC) महत्त्वाच्या पदांवर भरती होत आहे. इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे.

जर तुम्ही बीई किंवा बीटेकची पदवी घेतली असेल तर तुम्ही मुंबई मेट्रोमधील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता. व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक पदांसाठी ही भरती होत आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागेल.

मुंबई मेट्रोसाठी होणारी भरती नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टच्या माध्यमातून होत आहे. याबद्दलचं नोटिफिकेशन mahametro.org वर जारी करण्यात आलं आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया-

कोणत्या पदांसाठी भरती?

व्यवस्थापक (टेलिकॉम) – 2 पदं

व्यवस्थापक (सिग्नल) – 2 पदं

व्यवस्थापक (आईटी) – 1 पदं

व्यवस्थापक (ओएचई) – 1 पद

व्यवस्थापक (पीएसआई) – 1 पद

सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम ऍनालिस्ट आईटी/टेलिकॉम) – 2 पदं

सहाय्यक व्यवस्थापक (सिग्नल) – 2 पदं

सहाय्यक व्यवस्थापक (रॉलिंग स्टॉक) – 1 पद

सहाय्यक व्यवस्थापक (ओएचई) – 2 पदं

सहाय्यक व्यवस्थापक (ऊर्जा पुरवठा सप्लाई) – 2 पदं

सहाय्यक व्यवस्थापक (टेलिकॉम अँड एएफसी) – 2 पदं

आवश्यक शैक्षणिक पात्रता-

अर्जदारानं एआयसीटीई (एआयसीटीई) किंवा यूजीसीची (यूजीसी) मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठातून संबंधित शाखेमध्ये बीई किंवा बीटेक केलेलं असावं.

वयाची अट काय?

व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय कमाल ४० वर्षे असावं. तर सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय कमाल ३५ वर्ष असावं.

कसा कराल अर्ज?

या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज नोटिफिकेशनसोबत देण्यात आला आहे. तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी. तो व्यवस्थित भरून १३ जुलै २०२१ च्या आधी मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दिक्षाभूमीच्या समोर, रामदेशपथ, नागपूर- ४४००१० या पत्त्यावर पाठवावा.

निवड प्रक्रिया-

या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. अर्जदार शॉर्ट लिस्ट करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवर मुलाखतीची माहिती पाठवण्यात येईल. यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. मग निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

Share post
Previous Post

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

Next Post

भुसावळात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

Next Post
धक्कादायक : 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह जाळला

भुसावळात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group