मेष:- आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खाल.
वृषभ:- वाणी सौम्य ठेवून वागाल. मैत्रीपूर्ण संबंध जपावेत. कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ संभवतो.
मिथुन:- स्थावरचे व्यवहार सुसह्य होतील. कागदपत्रांवर सही करतांना सावधानता बाळगावी. भागीदारीच्या कामात सक्रिय व्हाल. नवीन संबंधातून क्षणिक सुख मिळेल. स्वत: विषयक चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.
कर्क:- जोडीदाराशी विसंवादाची शक्यता. तुमच्यातील अधीरता वाढेल. आपले विचार जवळच्यावर लादण्याचा प्रयत्न कराल. मनाजोगी खरेदी कराल. वरिष्ठांना खुश ठेवावे.
सिंह:- घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने वागावे. आभ्यासू लोकांचा सहवास लाभेल. नवीन विचार जाणून घ्याल.
कन्या:- फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील. गृहसौख्याला अधिक महत्व द्यावे. मतभिन्नता दर्शवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अपचनाचा त्रास जाणवेल.
तूळ:- दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचे त्रास संभवतात. तिखट व तामसी पदार्थ खाल.
वृश्चिक:- कोणतेही साहस करतांना सावधानता बाळगावी. हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील. नातेवाईकांना नाराज करू नका. भागिदारीतून लाभ उठवाल.
धनू:- जमिनीच्या कामात गती येईल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. समर्पक भावना दर्शवावी लागेल. वैचारिक दृष्टीकोन बदलून पहावा.
मकर:- सहकार्यांची वेळेवर मदत मिळेल. कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल. मनातील संभ्रम दूर सारावा. व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा लागेल.
कुंभ:- नवीन आव्हाने जाणून घ्यावीत. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल. बाग कामात मन रमेल. अनावश्यक खर्च टाळावा.
मीन:- इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल. काही कामे अधिक कस पाहतील.