Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सर्वसामान्य लोकांना दिलासा : खाद्यतेलांच्या किमतीत 30 रुपयांनी घट

by Divya Jalgaon Team
June 24, 2021
in राष्ट्रीय
0
सर्वसामान्य लोकांना दिलासा : खाद्यतेलांच्या किमतीत 30 रुपयांनी घट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात सुरू केल्याने आता त्यांच्या किमतीत ३० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक, गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिनाभरापासून खाद्यतेलाच्या चढ्या किमतीमुळे लोक बेजार झाले होते. भारतात खाद्यतेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे खाद्यतेलांच्या किमतीत सुमारे ४० टक्के वाढ झाली होती. देशात खाद्यतेलापैकी ६० टक्के आयात करण्यात येते; तर ४० टक्के उत्पादन स्वदेशातच होते. खाद्यतेलाची आयात वाढविल्याने आता किमतीमध्ये घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलांचे भाव चढे असताना त्याचे परिणाम भारतातही दिसत होते. गेल्या वर्षभरात खाद्यतेलांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. तातडीचे व दीर्घकालीन उपाय करून केंद्र सरकार या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

खाद्यतेलांच्या आयात शुल्कात प्रतिटन ८ हजार रुपयांची कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यात पामतेलाचाही समावेश आहे. या शुल्क कपातीची अधिसूचना केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने जारी केली होती. त्यानुसार क्रूड सोयाबीन तेलाचे आयात शुल्क प्रतिटन २७४६ रुपयांनी, तर क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रतिटन ८३१५ रुपयांनी घटविण्यात आले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमती सामान्य पातळीपर्यंत येण्यास मदत होईल.

अशा आहेत कमी झालेल्या किमती

शेंगदाणा तेल प्रतिकिलो १८० रुपयांवरून १५० रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल प्रतिकिलो १७० रुपयांवरून १४० रुपये, तर सोयाबीन तेल प्रतिकिलो १६० रुपयांवरून १३० रुपये व पामतेल प्रतिकिलो १५५ रुपयांवरून १२५ रुपये झाले आहे.

Share post
Previous Post

सोने – चांदीची दरात घसरण, जाणून घ्या दर

Next Post

पूर्व तयारी असल्यास महामारीवर मिळविता येतो विजय – डॉ. जयप्रकाश रामानंद

Next Post
पूर्व तयारी असल्यास महामारीवर मिळविता येतो विजय – डॉ. जयप्रकाश रामानंद

पूर्व तयारी असल्यास महामारीवर मिळविता येतो विजय - डॉ. जयप्रकाश रामानंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group