चोपडा, प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला. अमळनेर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व किसान रॅलीत त्यांचे आगमन झाले असता, चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने नाना पटोले यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के. डी. चौधरी, चोपडा शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सुप्रियाताई कांतीलाल सनेर, चोपडा शहर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, एन. एस. यु .आय. राज्य सचिव चेतन बाविस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे चोपडा येथील कार्यकर्ते, जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड संदीप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील, नंदकिशोर सांगोरे, राजेंद्र भास्करराव पाटील, प्रदीप पाटील, फातिमा जागीरदार, देवकांत चौधरी, आरिफ शेख, इलियास पटेल, एड. एस .डी पाटील, रमाकांत सोनवणे, सय्यद साहेब आदी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.