जळगाव प्रतिनिधी । शहरात आज रिक्षा पलटी झाल्याने चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाजवळ घडली. याप्रकरणी पाळधी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आहुजा नगर येथील वैष्णवी पार्कमधील सतिष सुरेश महाजन (वय-३५) हे राहतात. हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार २२ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाळधी येथे प्रवाश्यांना सोडून अहूजा नगर येथे घरी परतत असतांना बांभोरी गावाजवळील एसएसीबीटी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने रिक्षाने जात असतांना रिक्षा वरील ताबा सुटल्याने रिक्षा पटली झाली. त्यात रिक्षा चालक सतिष महाजन हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमोपचार केले असता रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई रूख्माबाई, वडीत सुरेश पंढरीनाथ महाजन, भाऊ किरण, रणजित आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. आज सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.